येथे वाचा. नाहीतरी भारतातील राष्ट्रपतीपदाला रबरी शिक्का एवढेच महत्त्व आहे. कोणताही क्रांतीकारक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या पदाला नाही.

सुमार केतकर वगळता एक महिला व मराठी माणूस घटनात्मक सर्वोच्च पदावर जाण्याचा आनंद बहुतेक सर्वांना झालाच आहे. सुमारसाहेबांना मराठी माणूस राष्ट्रपतीपदावर जाण्याऐवजी सोनियांचा माणूस राष्ट्रपतीपदावर जातोय याचा जास्त आनंद झाला आहे. :-)

मात्र कलाम साहेबांनी राष्ट्रपतीपदावर असताना असे कोणते निर्णय घेतले की त्यांची कारकीर्द इतरांच्या मानाने उजवी व्हावी? राष्ट्रपतीपदी कोणीही असले तरी तो काय निर्णय घेऊ शकतो? याउलट सर्व रामायण झाल्यानंतर जाता जाता "सर्वांचा पाठिंबा असेल तर पुन्हा राष्ट्रपती होण्यस तयार आहे" असे ते बोललेच ना.

अवांतर: अहर्ता हा शब्द योग्य आहे का? अर्हता हा योग्य शब्द असावा. स्वीकारार्ह वगैरे....