सुनीता विलियम्स सुखरूप परतो ही ईश्वरचरणी प्रार्थना ---- सहमत

सुनीता विलियम्स बद्दल च्या बातम्या भारतीय वृत्तपत्रांत वाचून कुतूहल वाटले. .... बातमी कां छापून आली म्हणून कुतूहल की त्या बातमीत गौरवास्पद शब्द लिहिले याचे कुतूहल?

सुनीता बद्दल चे प्रेम हे नक्की कशामुळे?  ... प्रेम कोण व्यक्त करीत आहे? पत्रकार की की सामान्य लोक? कोणाबद्दल प्रेम वाटणे ही वाईट गोष्ट आहे कां?

या सर्वाचा विचार केल्यास तिच्याबद्दलची आपुलकी ही अज्ञानातून की ती इश्वरभक्त  हिंदू आहे म्हणून की तिला भारतीय म्हटले की तिचे यश लाटता येते म्हणून.... म्हणजे आपुलकी वाटणे ही सुद्धा एक वाईट गोष्ट झाली कां?

अज्ञानातून असल्यास फार चर्चा करण्यात अर्थ नाही..... सहमत

हिंदू धर्मीय म्हणून कौतुक असल्यास तसे म्हणावेब... असहमत. कौतुक हे गुणांचे होते किंवा व्हावे.

यश लाटण्याचे कारण असल्यास अशा वृत्तींची कीव येते. ... इथे कोण आणि कसले यश लाटत आहे?

कारण याच देशात देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन यशस्वी झालेल्याबद्दल प्रेम/आदर/आपुलकी दूर राहिली पण तिरस्कार वाटतो ... तसे असेल तर ते योग्य नाही. पण सुदैवाने तसे नाही. विद्वान सर्वत्र पूज्यते हे सुभाषित अजून निकालात निघालेले नाही. या जगात गुणांची कदर करणारे लोक आहेत.

परदेशी संस्कृतीबद्दल तिरस्कार .. कोण करतो? आपण कुठल्या युगात वावरतो आहो?

मग परदेशी यशात वाटा का हवा?  .. मान्य. वाटा नकोच.

सुनीता अंतंब्राह्य अमेरिकन आहे .. असू दे. तिचे नांव सुनीता आहे एवढी गोष्ट तिच्याबद्दल किंचितशी तरी आपुलकी वाटायला पुरेशी आहे.