आणखी प्रश्न

कौतुक कशाबद्दल करायचे? गुणांबद्दल की भारताशी दूरान्वये का होइना काहीतरी संबंध आहे म्हणून? गुणांबद्दल करायचे म्हटले तर इतर अनेक देशांच्या अंतराळवीरांनी अनेक कामगिऱ्या केल्या आहेत त्या सर्वांचेही कौतुक करायला हवे. दुसऱ्या मुद्द्याबद्दल करायचे म्हटले तर केवळ वडील भारतीय होते ही गोष्ट कितपत कौतुकास्पद आहे?

माझ्या मते एखाद्या व्यक्तीने काय केले आहे हे बघावे. कौतुकास्पद वाटले तर कौतुक करावे. मग ती व्यक्ती ग्वाटेमालापासून टोकियोपर्यंत कुठलीही असली तरी.