आपणास मदत करू ईच्छित आहे परंतु त्यासाठी अधिक माहिती हवी. डेन्मार्क मध्ये आपले स्नेही नक्की कुठल्या शहरात/गावात जात आहे हे समजणे आवश्यक आहे. खूप जण लंडन वरून इंग्लंड बद्दल चुकीचे मत देतात. लंडन म्हणजे इंग्लंड नव्हे, एडिनबरा हे स्कॉटलंड नव्हे .....  कोपेनहेगन की ऊर्वरीत डेन्मार्क (नक्की कुठे) हे कळवावे. साधारण माहिती हवी असल्यास विकिपेडिया वर मिळेल, "Denmark" असा शोध करावा. विशिष्ट माहिती हवी असल्यास तेही जमू शकेल. आपल्या तीन प्रश्नांची उत्तरे आपल्या प्रतिसादानंतर देईन, तसे केल्याने अचूकता वाढेल असे वाटते. (अरेचा एक राहिलेच पुणे म्हणजे महाराष्ट्र नव्हे... अर्थात पुणेकर मंडळी सोडून बाकीचे ते जाणतातच. (म. घ्या.)

मनकवडा