अंडी नीट उकडली गेली आहेत किंवा नाहीत हे शोधण्यासाठी एक कसोटी -
उकडलेले अंडे भिंगरीप्रमाणे हाताने फिरवावे. जर व्यवस्थितपणे फिरले म्हणजे अंडे नीट उकडले गेले असे समजावे. जर न फिरता पडले तर अजून काही काळ उकडण्याची गरज आहे असे समजावे.
आणखी एक - उकडून तळलेली अंडीदेखील छान लागतात. थोडे तेल तापवून त्यात मीठ आणि हळद घालावी. त्यात उकडून सोललेली अंडी हळूच सोडावी आणि काही काळ किंचित परतावी.