सुनिता विल्यम्सचा या प्रकरणांशी बादरायण संबंध लावणे हा शुद्ध सनसनाटीपणा निर्माण करण्यातला प्रकार आहे. अंतराळात सर्वात अधिक काळ रहाण्याचा विक्रम करणे, कोलंबियाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त शारीरीक व मानसिक कसोट्यांतून तावून निघणे या सर्व गोष्टींसाठी ती - मग भारतीय असो की अभारतीय - कौतुकास पात्र आहे आणि ती सुरक्षितरीत्या पृथ्वीवर परत यावी म्हणून प्रार्थना करणारे सहृदयही. गुन्हेगारी बालकांच्या पंक्तीत तिला बसवणे म्हणजे पूर्वगृह विवेकाला कसे आंधळे बनवतात याचे उत्तम उदाहरण आहे.