केशव भिकाजी ढवळे प्रकाशन यांचा शब्दकोश ( न्यू स्टँडर्ड डिक्शनरी) तीन भागात प्रकाशित केलेला आहे.त्यातील पहिला खंड श्री. म. श्री.  सरमोकादम यानी व पुढील दोन खंड श्री गं. दे. खानोलकर यानी संपादित केले आहेत. कोशाचे स्वरूप  मराठी इंग्लिश-मराठी असे आहे आणि तो तयार करण्यास तीस वर्षाचा कालावधी लागला असा प्रस्तावनेत उल्लेख आहे.तीन भागाची मिळून पृष्ठसंख्या २५२६ इतकी आहे आणि बऱ्याच अंशी परिपूर्ण असा हा कोश वाटतो. सुवर्णमयी यांनी पाहून ठरवावे.