सुनीता विल्यम्स व तिचे सर्व सहकारी सुखरूप परत आले.
'ऋषींचे कूळ व नदीचे मूळ' शोधु नये असे म्हणतात. सुनीता विल्यम्स ही ऋषीही नाही व नदीही.
तिचे नातेवाईक भारतात आहेत. ती भारतीय वंशाची आहे (पर्सन ऑफ़ इंडिया ओरिजिन). अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा आनंद झाला नव्हता का? कल्पना चावला सुद्धा पीओआय होती जिचा दुर्दैवी मृत्यु झाला.
तेव्हा, तिचे भारतीय प्रसारमाध्यमांद्वारे कौतुक व प्रसिद्धि या गोष्टींचा एवढा त्रास का व्हावा?
कुठल्या ज्ञान-अज्ञानांच्या आधारे तिचे कौतुक करायचे का नाही हे कोण व कसे ठरविणार?
ज्ञान-अज्ञान हा गौण मुद्दा आहे.