प्रभाकरराव,
तुमचा अनुभव ऐकुन बराच हुरुप आला. काय असेल ते असो, मनाला पटो अथवा न पटो, मला वाटते की आपण पाकिस्तान्यांच्या विचार वगैरे करण्याच्या बाबतीत फार जवळ आहोत.
मी सुध्दा पाकिस्तानाला एकदा तरी जावे, प्रत्यक्ष स्थिती पाहावी, तेथील शाळकरी, महाविद्यालयीन मुलांना भेटावे अशी मला मनापासुन इच्छा आहे.
नागपूरला काही लोक भारत-पाकिस्तान मैत्री अशा संघटनेचे सभासद आहेत आणि त्यांच्या तर्फे मला जायची इच्छा आहे. दुसरा कोणता मार्ग आणि मार्गदर्शन करेल तर मला आनंदच होईल.
पण भविष्यात तरी चांगले घडेल असे वाटते. अर्थात त्यासाठी प्रचंड पराक्रम करावा लागेल हे नक्की. ( अमेरीकेचे एफ-१६, १९ चा घोळ अशा प्रक्रियेला खिळ घालेल हेही लक्षात ठेवावे लागेल).
भुट्टो बाईची भारत भेट माझ्या मते पाकिस्तानमधील जास्तीत जास्त लोकांना भारत भेटीसाठी उद्युक्त केले पाहीजे.
असो.
द्वारकानाथ.