स्रीचे शरीर हे जगातील सगळ्यात सुंदर शिल्प मानले गेले आहे आणि म्हणूनच प्राचिन शिल्पकारांनीही लेण्यांमधूनही शृंगार रसाला प्राधान्य दिले. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजांमध्ये 'काम' ही येते. पण भार्गवराम यांनी म्हंटल्याप्रामाणे महाराष्ट्र पोवाड्यामध्ये जितका रमला तितका क्वचितच दुसऱ्या कोण्त्या क्षेत्रात रमला असेल.

या शृंगार रसाचे वर्णन करण्यासाठी लागणारी कोमलता मराठमोळ्या माणसाला कधी जमलीच नाही. तथापि, त्याकडे वाह्यात लेखन म्हणूनच पाहिले गेले. आणि त्याचे वर्णन "दुसऱ्याच्या थोबाडात थोबाड घालून काय तो पचाक पचाक आवाज काढायचा?" अशा पद्धतिनेच केले गेले. त्यामुळे याला अश्लिल लेखनाचाच दर्जा मिळाला. परिणामी, मराठीमध्ये शृंगार रसाचे वर्णन करणारे लेखनही कमी झाले.

हे माझे मत आहे.

- प्राजु.