आता शेतकर्यांच्या आत्महत्या व एस.ई‍‍.झेड. प्रकरण बघता समाजवाद आहे असे वाटते का?

नाही आहे तेच बरे आहे!!४० वर्षे समाजवादाने देशाची वाट लावली, देशाला नादारीच्या दारात पोचवलं. एका आठवड्याचे आयात बिल भरण्याइतकेही पैसे उरले नव्हते. रिझर्व बँकेला देशाचे सोने परदेशी गहाण ठेवावे लागले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा संबंध समाजवाद किंवा भांडवलवादाशी नसून शास्त्यांच्या बेफिकीरीशी, निर्ढावलेपणाशी व नाकर्तेपणाशी आहे. आणि पोकळ घोषणांनी कोणाचे पोट भरत नाही.