सुनिता अथवा सिंडि काहीही असो. सगळे जण सुखरूप परत आलेले आहेत. मला नाही वाटत की ती अथवा तिचे वडील भारत सोडून गेल्या नंतर परत भारतात आले होते.
तिने भगवत गीता अंतराळात घेऊन गेली म्हणून काय हिंदू बनत नाही. गीतेमध्ये तिला आवड असावी म्हणून हि कदाचित घेऊन गेली असावी.
पण एखाद्याच चार दिवसांसाठी उदो उदो करण्यात काही एक अर्थ नाही. त्या लोकांनी जर खरोखरच भारतासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केलेला असेल तर मग काय हरकत नाही.