आपण अतिशय अवघड आणि नाजूक विषय मुद्देसूद मांडलात. अभिनंदन.
धरले तर चावते सोडले तर पळते:
मोगलपूर्व मराठीचे माझे ज्ञान नाही. मोगल काळातील मराठी लिखाण हे भक्तिमार्गाकडे झुकलेले वाटते (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व इतर संत वाडज्मय.) मोगलोत्तर काळात तरुण वर्ग वीर रसात गुंतला, याचा अर्थ त्याकाळी शृंगारात कुणाला रस नव्हता असे नव्हे तर तसे लिखाण पुढे आले नाही/आणले गेले नाही. परकीय राज्यकर्त्यांना उलथून लावणे हे मुख्य कार्य होते. याचा अर्थ शृंगाररसात लिखाण झाले नाही किंवा हे लिखाण इंग्रज काळात समाजमान्य होऊ शकले नाही. पुराव्याअभावी आपला मुद्दा की मराठी साहित्य इंग्रजांचा गुलामगिरीमुळे शृंगाररसाला मुकले किंबहुना मराठी मानसिकता ही इंग्रजी झाली हा मुद्दा वेदनादायक आहे यात संशयच नाही. शृंगाररस, स्त्री-पुरूष संबंध याबद्दल लेखकाला लिहावयाचे असल्यास समाजात दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य व दुसरे सुरक्षितता. महाराष्ट्रात (व भारतातही) या दोन्ही गोष्टी गेल्या १००० वर्षात अस्तित्वात नाहीत (पुरावा: महाराष्ट्रात मोगल साम्राज्याची भीती, इंग्रजांची भीती, स्वातंत्र्योत्तर तथाकथित संस्कृती रक्षण करत्यांची भीती). हीच मानसिकता इंग्लंड मध्ये दुसऱ्या महायुधापर्यंत होती, इस्लामिक राष्ट्रात अजूनही आहे. याउलट फ़्रांस, नेदरलँडस ही वानगीदाखल उदा. यांना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय हे समजले. कला अशाच संस्कृतीत उदयाला येते. म्हणूनच भारतात कला मोगलपूर्व काळात पुजली गेली पण आपण ते गमावले व इंग्रजाचे गुलाम होऊन तेच आपले हे मान्य केले. आता धरले तर चावते सोडले तर पळते अशी आपली स्थिती आहे.
मनकवडा.