नमस्कार,

सचिनजी तुम्ही फारच छान विषय सुरू केलात.

मला वाटतं -

१. हा कार्यक्रम पहावा किंवा नाही ही सर्वस्वी ऐच्छिक बाब आहे. असे भिकार (किंवा भिकार नसणारे) अनेक कार्यक्रम चालू आहेत आज. (कुणाच्या निवडी विषयी एवढा विखार ठीक नाही!) पण 'युद्ध ताऱ्यांचे' या कार्यक्रमात केवळ नट आहेत आणि ते शिकाऊ गायक आहेत, म्हणून त्याला भिकार म्हणणे चांगले वाटले नाही.

२. आपण म्हणता 'नट असतील तर त्यांनी अभिनय करावा'. अभिनय करणाऱ्याने गाऊ नये असेही काही नाही. नाट्यसंगीत तर याचे सर्वोत्तम उदा. आहे.

३. SMS बद्दल जे म्हणता आहात ते मात्र पटण्यासारखेच आहे. SMS  ने मतदान करणे हे VIRTUAL REALITY प्रमाणेच आहे.

आपली प्रतिक्रीया पाहण्यास उत्सुक आहे.

... अमितराज देशमुख