१.झी मराठीवर युद्ध ताऱ्यांचे नावाचा एक भिकार कार्यक्रम नुकताच पार पडला.
भिकार कार्यक्रम म्हणण्यायेवढा वाईट नव्हता.अंतिम फ़ेरी सोडली तर बाकीचे सर्व भाग अतिशय चांगले होते.अंतिम फ़ेरी मात्र अतिशय सुमार गाण्यांनी भरलेली असल्याने निराशा झाली.
२.नट असतील तर त्यांनी अभिनय करावा. त्यांची शिकाऊ गाणी प्रेक्षकांनी का म्हणून ऐकून घ्यायची?
ते नट असले म्हणुन त्यांनी गाणं म्हणु नये हे आपण कसं ठरवणार? ते त्यांना हवं ते करु शकतात. उलट त्या स्पर्धकांना या कार्यक्रमाने चांगले व्यासपीठ मिळवुन दिले.आणि स्पर्धक चांगले गातही होते.
पण इतर वाहिन्यांवर चालु असलेल्या सध्याच्या हिंदी गाण्यांच्या नाटकी कार्यक्रमापेक्षा (मार्गदर्शकांची भांडणे,स्पर्धकांनी स्टेजवर चक्कर येउन पडणे ई.) हा कार्यक्रम अतिशयच चांगला होता.
३.एसेमेस चा मुद्दा मात्र पटला.