अर्थात असले कार्यक्रम पाहणारे आणि एसेमेस पाठवणारे आपण प्रेक्षकही तितकेच मूर्ख आहोत नाही का?
अहो, असे प्रेक्षक लाखांच्या संख्येने आहेत आणि अगदी तुमच्या आमच्या घरातसुद्धा सापडतील. त्यांचं काय करायचं?

अगदी हाच प्रश्न माझाही आहे. तुम्हीच सांगा काय करायचे? जनहितार्थ याचिका टाकण्याचा विचार आहे.

शेवटी हे लोक नट-नटवे आहेत आणि झाले ते नाटकनौंटकी होती.
होतीच. कोण नाही म्हणतंय? म्हणून तर ती इतक्या लोकांनी पाहिली आणि त्यांना त्यात भरपूर आनंदसुद्धा मिळाला हे मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.

हो ना. दुर्दैव आहे. आणि दुसऱ्या वाहिन्यांवरील चांगले कार्यक्रम त्यामुळे हुकले.