मुद्रिते तपासण्याचे काम प्रूफ रीडरचे आहे आणि शुद्धलेखन तपासण्याचे काम संपादकाचे आहे हे मान्य. 
आता छपाई ऑफसेट पद्धतीने होत असली तरी, माझा मुद्दा असा होता की जो कोणी संगणकावर का होईना सहित्त्य टंकलिखित करीत असेल त्याच्याही लक्षात अशा अशुद्धलेखनाच्या चुका यायला हव्या. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या एकूणच साखळीत प्रत्येक पायरीवर अशी सजगता असायला हवी, असे मला वाटते.