ह्या दोन टोकांच्या पावसाच्या वर्णनांबद्दल, त्यातील सर्वस्वी भिन्न अशा शैलींना अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद! दोन्ही आपापल्या तऱ्हेने मोहवणारी, पण व्यक्तिश: मला बनगरवाडीने जी भूल अनेक वर्षांपासून घातलेली आहे, तिला परत जाग आली. त्या कादंबरीतील सहससुंदर निसर्गवर्णने मराठी साहित्याचे वैभव आहेत असे म्हटले, तर ती अतिशयशोक्ती ठरू नये. आजकाल मी चित्तमपल्लींचे 'चकवाचांदण' वाचतो आहे. चित्तमपल्लींची शब्दकळा विलक्षण आहे व त्यांची निसर्गवर्णने अलंकारीक न होता, बरेच काही आपल्या डोळ्यासमोर सहजपणे उभे करणारी आहेत. ते झाडांना, फुलांना, पाखरांना, किड्यांना, व जनावरांना खास मराठी नावांनी संबोधतात, व तेही इतक्या सहजपणे, की आपण केवळ चकित होतो. असो, हे थोडे विषयांतर झाले.
'लिप्ताळा' म्हणजे नेमके काय?
असेच लिहित चला.