एका मराठी अनुदिनीकाराचे संगीतस्पर्धेतील SMS प्रकाराबद्दलचे खालील परखड मत अत्यंत सार्थ वाटते!
sms मागवून मांडला जातो तो संगीताचा बाजार! ते संगीत नव्हे! 'माझं गाणं आपल्याला आवडलं असेल तर please please please मला मत द्या' असा सांगितिक जोगवा मागणाऱ्या कलाकारांची मला अक्षरश: कीव येते. कुठल्याही कलाकाराची कला ही कुठल्याही sms ची मिंधी नसते, नसावी असं मला वाटतं! वीणाधारी, श्वेतवस्त्र परिधान केलेल्या प्रसन्न व तेज:पुंज मुद्रेच्या सरस्वतीला असं फाटक्या वस्त्रानिशी sms द्वारा मतांची भीक मागताना पाहिलं की खरंच खूप वाईट वाटतं! पण मंडळी, खरं तर ही सरस्वती नव्हेच, असंच म्हणायला हवं. ही तर संगीताच्या बाजारातली रस्त्यावर बसलेली एक वारांगना!
कळावे,
मंदार धारप.