लिप्ताळाचा मला माहीत असलेला अर्थ म्हणजे गुंतलेले असणे/गोतावळा, किंवा सुवर्णमयी म्हणतात तसे एकूणच व्याप्ती. अर्थात अ-'लिप्त' च्या अगदी विरूद्ध. मूळ संस्कृत धातू कदाचित 'लिप्' असा काहीसा असावा आणि त्यातूनच अलिप्त, लिप्ताळा, लेप, निर्लेप, विलेपित (भस्मविलेपित मधले) असे शब्द आले असावेत, असा अंदाज आहे. जाणकारांनी कृपया यावर अधिक प्रकाश टाकावा.