स्निग्धा यांच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो पण त्यांनी नंतर या विषयावर प्रतिसाद दिलेला दिसत नाही.

कुशाग्र आपल्या मताचा अभ्यास व विचार केला त्यावर माझे मत व्यक्त करावेसे वाटले.

मराठी भाषेला किंवा मनोगतालाही शृंगाराचे वावडे आहे असे वाटत नाही. तसे लिखाण कोणी केले आणि प्रशासकांनी ते काढून टाकले किंवा इतर मनोगतींनी त्यावर टीकेची झोड उठवली असे झाले तरच असे म्हणता येईल - पण असे लिखाण होत नाही हे खरे आहे

संस्कृत वाचले आहे व शृगारीक नाटके, काव्ये भरपूर आहेत. मराठीत त्यांचे भाषांतर झाले आहे पण मराठी मध्ये तसे लिखाण स्वतंत्र नाही.

शिवाय त्याचा अनुवाद करताना आपण कुणाच्या भावनांना धक्का लागणार नाही अशी दक्षता घेणार त्यामुळे म्हणायचेच झाले तर मराठी माणसालाच शृंगाराचे वावडे आहे असे म्हणावे लागेल: भावना दुखावल्या जातात भावनांना धक्का लागतो यातच अपरिपक्वता आली.

इंग्रजांच्या आक्रमणामुळे हा परिणाम झाला या सिद्धान्ताचा मी विचार व अभ्यास करीत आहे. मी ब्रिटिश ग्रंथालयात जाऊन यावर काही साहित्य मिळते का याचा शोध घेईन.

त्यामुळे केवळ मराठीवर असा आरोप करणे अन्यायकारक ठरेल. या मुद्द्याशी मी असहमत आहे. मराठी साहित्याबद्दल नंतर बोलता येईल पण महाराष्ट्रीय , विशेषता: शहरी, संस्कृती ही शृंगार, स्त्री-पुरुष संबंध व लैंगिकता या विषयांवर अत्यंत दांभिक, अपरिपक्व व मूळ भारतीय संस्कृतीशी नाळ तोडून आहे यात शंका नाही.

मनकवडा