नमस्कार प्राचीताई,
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपण ही शंका उपस्थित केलीत, खूप आनंद वाटला. कविमन शोध घेत जाते पण नेहमीप्रमाणे ती त्याला हूल देतात म्हणून पैंजणांना तो नाठाळ म्हणतो. एक ना एक दिवस त्यांचे सुरेल गाणे ऐकायला मिळेल अश्या वेड्या आशेने पुन्हा पुन्हा शोध घेत राहतो असे काहीसे म्हणावयाचे होते. कदाचित आम्ही ह्यात कमी पडलो असू.
असेच मोकळेपणाने प्रश्न उपस्थित करत जावेत ही नम्र विनंती.
आपल्या मनोगतावरील वावरास शुभेच्छा!
आपला
(स्वागतोत्सुक) प्रवासी