कार्यक्रम कसा का असेना रिमोट ची कळ तर तुमच्या हाती आहे नां?

कळ आमच्या हातात असती तर इतका थयथयाट करावा लागला नसता. आमच्या बायकापोरांना म्हाताऱ्याकोताऱ्यांना ह्या असल्या आणि त्या तसल्या मालिकांनी नादाला लावले आहे. आणि माझ्या खोलीत मी माझा वेगळा चित्रवाणी संच थाटीन असला पाश्चात्य तुसडेपणा आमच्यात नाही. संध्याकाळचे काही क्षण तर मिळतात कुटुंबाबरोबर. तेव्हा तिथून उठून जाणे पण बरे वाटत नाही.