सुरेख वर्णने. मातीचा गंध आला आणि थेट नाकपुड्यांतून धमन्यांत शिरला. काही मेंढरही तेवढ्यात आली आणि मला 'आवारे मराठा खानावळी'ची आठवण आली. तर  'पाऊसनांदीची पिंजण' आणि लिप्ताळा:):) हसू काही आवरले नाही. ग्रेसच्या ओळी दिल्याशिवाय किंवा त्याने घडविलेले शब्द दिल्याशिवाय ब्लॉगलेखनाचे सार्थक होत नाही असे अनेक अनुदिन्या वाचून वाटले. सार्त्र, कामू, काफ्का, गालिब, जीएही हवेत कधी त्याशिवाय कसे वजन येत नाही. शेक्सपिअर आणि मिल्टन तर नेहमीच फॅशनेबल होते म्हणा. गुलजारचा तर कल्टच. गुलजार वाचायचा, हळवे व्हायचे, एखादा अश्रू डोळ्यांत आणायचा. वा क्या बात है!  असो.  नंदन, तुमचे समीक्षेचे पुस्तक कधी येते आहे, नक्की सांगा. त्यापूर्वी पाटणकर, दभिंपासून रा. ग. जाधवांपर्यंत सगळे समीक्षक वाचून काढतो. असले शब्द वेचून ठेवतो. जीएंच्या शब्दांची कुणी यादी बनविली तर किती उत्तम होईल. कुणीतरी हे काम करायला हवे.म्हणजे काहीही वाचन न करता आम्ही व्यासंग दाखवायला मोकळे. :)