खरंच कठीण मामला आहे. सुशांत सुभेदारचा वेडाचा झटका किती वर्षं/दिवस होता, अनुराधाचे कोमामधले दिवस इथपासून तर पार्थच्या डीएनए रिपोर्टमधली ४२ नंबरची ओळ इथपर्यंत सगळं आठवतं हो...
मुलांचे शालेय शिक्षण अशा मालिकांच्या स्वरुपात का देत नाही?
दुर्दैवाने जेवण चालू असताना घरी ही मालिका मन लावून पाहिली जाते आणि मालिकेला विरोध केला तर कदाचित आमचीच डीएनए टेस्ट करण्याची मागणी घरचे करतील अशी भीती वाटते.