जीवनाचा डाव अजुनी मांडते आहे
जिंकण्यासाठीच सध्या हारते आहे
भूतकाळाच्या चुका विसरून मी आता
हासुनी या आसवांना मारते आहे
रात्र काळोखी इथे पुरणार मी आहे
वाट पाहत त्या उषेची जागते आहे
पहिल्या ओळीत नक्की काय म्हणायचे ते कळले नाही. रात्र पुरणार आहे की पुरून उरणार आहे काही कळले नाही.
शल्य बाहेरील दुनियेचे झुगारूनी
शांत संसारात माझ्या नांदते आहे
या जगाने कोडगे केले किती मजला
प्रेत पूर्वीच्या 'अनु'चे जाळते आहे..
प्रत्येक द्विपदीची तुमच्या द्विपदीशी तुलना करून वृत्तातल्या चुका तुम्हीच शोधून काढा. जाताजाता, ही गझल अवंतिकाच्या शीर्षकगीतावरूनसुचली का?