द्वारकानाथजी,
माझ्या मते लोकं मराठीमाध्यमातून तेव्हाच शिकतील जेव्हा त्यांना त्या शिक्षणाचा वापर करता येईल, नोकरी मिळवता येईल. असे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे उद्योग, व्यवसाय उघडणे ज्यांत व्यवहार फक्त मराठीत चालेल, आणि म्हणून नवीन नोकर्‍या वगेरे मराठीत व्यवहार करणे येणार्‍या सुशिक्षितांनाच देण्यांत येतील. असे झाले तरच आई-वडील आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये भरती करणे याग्य समजतील, आपल्या मुलांच्या भविष्यांबद्दल त्यांना विश्वास वाटल वगेरे. एखादा Architect मराठीतून शिकला असे किंवा इंग्रजीतून काहीच फरक पडत नाही. पण Architecture firms ज्या नोकर्‍या देतात त्यांना इंग्रजीमाध्यमातून शिकलेलाच पाहिजे असतो, तर मग कोणी मराठीमाध्यमात का शिकावे?