या मालिका दोन महिन्यातून एखादा भाग पाहिला तरी समजण्यास अडचण येत नाही.
तीच कहाणी पुढील पिढीत किंवा फक्त पात्र बदल असतो.
अथवा चहा हवा आहे का ? आज खूप दमलो.. अशा कहाणी न पुढे नेणाऱ्या संवादांना मालिका आजन्म चालवण्याचे याचे श्रेय द्यावे लागेल.
तेच ते चेहरे वेगवेगळ्या मालिकात असल्याने काही क्षण अशा अनियमित प्रेक्षकाचा गोंधळ उडू शकतो. पण विशेष फरक पडू नये.
आजकाल कोणत्याही पात्राला कोमात नेणे, परदेशात पाठवणे, प्लॅस्टिक सर्जरी करून कायापालट करणे अशा पद्धतींचा सुकाळ झाला आहे. सुमार संकल्पना आणि अभिनयाची कसर भरून येत असावी