छू यांच्याशी सहमत.

फक्त जरा जास्तीच लांबवला होता. या आधी जी गाणी या कार्यक्रमामधे गायली गेली ती खरच वेगवेगळ्या प्रकारची होती याचे कौतुक आहे. प्रसाद ओकने भारूड छान गायले. "आली आली हो भागाबाई" अष्टविनायका तुझा महिमा कसा , देवीचा गोंधळ ही गाणी पण एकदम जोशात गायली. बाकीचे कलाकार पण चांगले गायले. सुनील बर्वेने पण प्रसाद ओकच्या तोडीस तोड वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली. पल्लवी जोशीचे निवेदन तर पहिल्यापासूनच चांगले आहे. उगाच वायफळ बडबड करून कुठेही अतिरेक करत नाही.

 sms चा प्रकार सोडता एकूणच हा सारेगमचा कार्यक्रम इतकी टोकाची नावे ठेवण्याइतका वाईट नक्कीच नाही. प्रेक्षकांना पण sms वरून आपले मत नोंदवता येते यात वाईट काय आहे?