तिरफळे ही गोलसर, साधारण करवंदाच्या आकाराची, तपकिरी रंगाची असतात. त्याला एक विशिष्ठ उग्र वास असतो (जो पदार्थात घातली असता छान येतो !).  याला "तेपळे" असेही एक नाव आहे. कोकणात माशांच्या पाककृतीत तिरफळे सर्रास वापरली जातात. शाकाहारी पदार्थात, डाळी करतानाही तिरफळे वापरली जातात.