"मासिक पाळीच्या काळात स्त्रीयांनी खोलीतून बाहेर पडू नये." (किंवा तत्सम)

पूर्वी लज्जा कारणास्तव तोंडाने सांगता न येण्याजोगी ही गोष्ट होती. या काळात स्त्रीयांना होणारा त्रास वाढू नये म्हणून, घरकाम कमी असावे म्हणून हा नियम  ओघातच आला.

पण दुर्दैव हे की चांगल्यासाठी असणारा हा नियम जाच झाला आहे. अनेक ठिकाणी स्त्रीयांना मनाविरुद्ध  - 'देवाजवळ जाऊ नकोस', 'इकडे शिऊ नकोस' असले अमानुष नियम पाळावे लागतात.

मोठी गोष्ट ही की हे संस्कार समजले जातात!

... अमितराज देशमुख.