मुलांच्या बोलण्यतील मार्दव , गोडवा कमी होत चालला आहे. किंचाळणे , ओरडणे, हट्ट करणे ( मलिकेतील हावभाव/वाक्ये ) आवडिनिवडीत बदल ही काही उदाहरणे आहेत. मुले अधिक प्रगल्भतेने वागु लागलेली दिसतात जे त्यांच्या वयाला शोभत नाही. कार्टुन्स पहाण्या ऐवजी या मालिका पहाणे पसंत करणारी मुलेही आहेत. या मुलांच्या चर्चाही अशाच प्रकारच्या असतात.