तसे पाहिले तर हे जगणे अवघड नसते
दु:ख लपवुनी वरवर हसणे अवघड नसते...
चांगला आहे पण हे भरीचा.
प्रेम दाखवू नकोस आता नजरेमधुनी
शब्दांमध्ये कबूल करणे अवघड नसते...
बरा आहे.
आपण दोघेजणही नाही बदलू शकलो
कोण म्हणाले 'सवय बदलणे अवघड नसते'?...
ठीक.
जीवन 'जगताना' मी रोजच अनुभवतो हे
यापेक्षा एकदाच मरणे अवघड नसते...
कसे कळले? काहीतरीच शेर.
वेदनेतुनी जन्म घेतसे 'अजब' गजल, मग-
शब्दफुलांची माळ गुंफणे अवघड नसते...
वरच्या ओळीचा खालच्या ओळीशी संबंध काय? अजब भरीचा. गझल ठीक आहे पण अशा फालतू जिलब्या रचणे अवघड नसते.