विडंबन बरे आहे पण

आमची प्रेरणा अजबयांची सुरेख गझल अवघड नसते...

सुरेख? अजबयांची चूक.

तसे पाहिले तर हे नटणे अवघड नसते
पोट लपवूनी सुडौल दिसणे अवघड नसते...

ठीक. लपवूनी चूक.

नुसते खुणवू नकोस मजला नजरेमधुनी
(आडोशाला मला भेटणे अवघड नसते )

ठीक.

येता जाताना मी रोजच अनुभवतो हे
बेंबी खाली पँट घालणे अवघड नसते

छान. पण पँट अमराठी.

वेदनेतुनी जन्म घेतसे 'अजब' गजल, पण-
सुमार विडंबन त्यांचे करणे अवघड नसते...

सुमार शब्दाचा चांगला वापर. वृत्तात मार खातो. शेर खारिज.

विड्या फुंकणे कधीच नाही सुटले "केश्या"
कोण म्हणाले 'सवय सोडणे अवघड नसते'?...

अनावश्यक. भरीचा शेर.