प्रतिभाताईंची बरीच प्रकरणे बाहेर निघत आहेत. ती दडपण्याच्या आणि राष्ट्रपतिपदाच्या मोबदल्यात सोनिया गांधी त्यांच्याकडून काय काय करून घेतील ह्याची कल्पनाही करवत नाही. त्यांची राज्यसभेच्या उपसभापतिपदाची कारकीर्द अयशस्वी ठरली होती. राजीव गांधींनी त्यांना हटवून नजमा हेपतुल्ला ह्यांना त्या खुर्चीत बसवले होते.
शिवराज पाटलांना पाठिंबा न देणारे बाळासाहेब ठाकरे मराठी माणूस म्हणून प्रतिभाताईंना पाठिंबा देतात हा काय प्रकार आहे?