विनोदासाठी वापरलेल्या सूचना काही खाजगी वा सरकारी कार्यालयात इंग्रजीत प्रत्यक्षात असाव्यात हे उघड आहे. त्यातील क्रमांक ५ ची सूचना avoid speaking in regional languages ............ ही आक्षेपार्ह आहे. स्वातंत्र्याची ६० वर्षे पुरी होत आली असता अशा प्रकारच्या सूचना आपल्याच देशात आपल्याच माणसांकडून देण्यात याव्यात व कोणालाही त्यात वावगे वाटू नये यावरून गुलामगिरीचे विष भारतीय समाजात किती खोलवर भिनले आहे ते दिसून येते. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांतही विद्यार्थ्यांना मातृभाषेतून बोलण्यास मनाई करण्यात येते.