कथा लिहिताना जरा घाई झाल्यासारखे वाटते आहे.
ज्ञान, अनुभव, विचारांची प्रगल्भता, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती, अहंभाव, सामंजस्य ह्या सर्व गुण-दोषांचा आणि लिंग,वयाचा काही संबंध नसतो.
स्वभावातील कित्येक दोष जन्मभराचे साथी असतात. संसारात तडजोड ही करावीच लागते. पण ती एकतर्फी असली की अन्यायकारक होते. बंडखोरी जन्मास येते. भांडणे होतात. हताशा अनुभवास येते.
स्वातीने गुंतवणूक, शेअर मार्केट यातलं आपलं अज्ञान पाजळलं होतं आणि माफीही मागितली होती.
ही ट्रिक किती दिवस वापरणार? आणि ह्यातच 'समजविण्याचे सर्व मार्ग खुंटल्याची' स्विकारोक्ती दिसून येते.
ज्या समस्या समपातळीवरील चर्चेतून सुटतात त्यातून स्वभावात बदल आणि भविष्यात समस्यांना दूर राखणे शक्य होते असे वाटते.
कथेचा विषय, सुरुवात, मध्य उत्तम जमला आहे. शेवट 'उरकलेला' वाटला.
स्वभाव दोषाची समस्या अजून विस्तृत प्रमाणात मांडण्याची गरज आहे.
अभिनंदन.