तेच विकले जाणार ह्यात काही वाद नाही. त्यामुळे रिमिक्सला आणि त्या अनुशंगाने येणाऱ्या व्हिडिओस ना मरण नाही. शेवटी नव्या संकल्पनांना नेहमीच विरोध होतो. जसा आर. डी. च्या गाण्यांना त्या काळात झाला होता. पण त्यांची गाणी तरुणांनी उचलून धरली. तसंच काहीस रिमिक्स च पण होईल असे वाटते. अर्थात सर्व रिमिक्स चांगले असतात असं नव्हे. शेवटी उडदामाजी काळे गोरे हे असायचेच.

आनंदाची गोष्ट ही आहे की अजूनही शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांची गर्दी असते. त्या कलेला मरण नाही. पण काळाची पावलं ओळखून बदलायला हरकत नसावी. सर्वच व्हिडिओस अचकट विचकट असतात असे नव्हे. काही चांगलेही असतात. पण सहसा आपल्या दृष्टीत वाईट गोष्टी भरतात आणि चांगल्या कामाकडे दुर्लक्ष होते असे वाटते. त्यामुळे सगळं नवं ते वाईट आणि सगळं जुनं ते चांगलं असा एक सूर ह्या लेखातून दिसतोय तो योग्य नव्हे असं वाटतं. नवं ते हवं पण जुनं ते सोनं हे दोन्हीही एकावेळी करता येईल.