'क' पासून सुरु होणारी एक मालिका बघताना माझ्या छोट्या मामेभावाने सगळ्यांसमोर मामाला विचारले," या सगळ्या काकू अश्याच दुष्ट असतात का हो? " त्यावेळी त्याला दुष्ट या शब्दाचा अर्थ कितपत माहीत होता हे आम्हांला माहीत नाही. त्याचा हा निरागस प्रश्न सगळ्यांनीच हसण्यावारी नेला पण मालिकांमध्ये दाखवली जाणारी स्त्री पात्रे बघून एखाद्या लहान मुलालाही असा प्रश्न पडू शकतो.