मराठी भाषा व संस्कृती चा अभिमान असणाऱ्या मंडळींना आता काय वाटते?

आपल्याला स्वतःला असा अभिमान नाही काय?

मला वाटते आपला वैचारिक गोंधळ उडाला आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा अभिमान असणे ह्याचा व भाजप, शिवसेना, प्रतिभा पाटील ह्यांची निवडणूक ह्यांचा संबंध काय? मला मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा रास्त अभिमान आहे, पण भाजप, शिवसेना वगैरे फालतू राजकारणाशी माझे काहीही देणेघेणे नाही.

जगात भारताची प्रतिमा काय आहे याला मात्र मी महत्त्व देतो करणं त्याचा परिणाम भारताच्या अर्थशास्त्रावर परिणामी सामान्य माणसाच्या राहणीमानावर होतो.

जगातल्या प्रतिमेवर आपली आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे, हे चूक आहे. एखाद्या देशाची प्रतिमा दोन बाबींवर अवलंबून असते-- पहिली त्याची आर्थिक स्थिती, जी मजबूत असेल, तर त्या देशाला महासत्तांचे हात, पाय, कान पिळण्यास शक्ती येते. दुसरी त्याच्या राज्यकर्त्यांची -- व पर्यायाने तिथल्या जनतेची--मानसिकता. जेव्हा देशवासी कणाहीन, स्वत:च्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान नसलेले असतात, तेव्हा आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरी त्यांची जगातील प्रतिमा वाईट असू शकते, कारण ही जी शक्ती आहे, तिचा त्या देशाला वापर करणे जमत नाही-- उदा. फिलिपाईन्स. आपली आर्थिक स्थिती चांगली नाही, व ती तशी असली, तरी वर उल्लेखिल्या बाबींमुळे आपण नेहमी कमकुवत, 'कुणीही यावे, टपली मारून जावे' असेच आहोत, व इथून पुढेही आपण तसेच राहणार. 

देशाला राज्यकर्ते मिळतात, ते त्या जनतेला साजेसेच असतात, हे अगदी खरे आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापासून आम्हाला कणाहीन, 'तू एक मारणार, मी मलाच दोन मारून घेतो' अशी मानसिकता असलेले राज्यकर्ते मिळत आले-- त्यात भाजप आहे, व काँग्रेसही! इंदिराबाई थोड्या वेगळ्या होत्या, बाकी सगळा आनंदी आनंद!