खरे म्हणजे आपली शिक्षण पद्धती व्यवस्थित पाहिली ना तर एक मोट्ठा खड्डा दिसून येतो. तो आहे अनुत्तीर्णांसाठीचा! .......शिक्षण नाही म्हणून पुरेश्या संधी मिळत नाहीत आणि ही मुले आणखी खोल अशा आर्थिक संकटात सापडतात. मुळातच आपल्या    शिक्षण पद्धतीत बदल हवे आहेत, पण एवढे मोठे बदल करण्याआधी (किंवा करतांना) शिक्षणापासुन वंचित राहणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल?

मला वाटते, आपल्याकडे अधिकृत ('फॉर्मल'ला ह्याहून चांगला शब्द सुचला नाही, कुणीतरी सुचवावा) शिक्षणाला अवास्तव महत्त्व आहे. माझे निरीक्षण असे आहे की विकसित देशात असे नसते. कुठल्याही संस्थेत अगदी वरच्या थरावर काम करायचे असेल, अथवा काही विवक्षित प्रावीण्याची जरूर असेल, तर संबंधित विषयाचे खोल ज्ञान आवश्यक आहे, व अधिकृत शिक्षणाने ते नीट मिळू शकते, हे खरे असले, तरी सर्वसामान्य कर्मचारी उच्चशिक्षित असतातच असे नव्हे. आपण काम कसे करता आहात, ह्याला महत्त्व दिले जाते, शिक्षणाला नव्हे. अशामुळे शिक्षण नसतानाही अंगहुशाऱी, मेहेनत करायची सवय, निरीक्षणशक्ती इत्यादी गुणांमुळे माणसे पुढे जाऊ शकतात. मुख्य सांगायचे तर, शिक्षण नाही, तर संधी नाही, असे नसते.   

'आपल्या शिक्षणपद्धतीत बदल हवे आहेत', असे म्हणून थांबून न रहाता, आपली ही संस्था आपल्या पद्धतीने सकारात्मक काम करत आहे, हे फार सुखावह आहे. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपण दिलेली माहिती अव्यवस्थित अजिबात वाटली नाही, हे इथे मुद्दाम नमूद करतो.