परदेशी यशात वाटा का हवा?.......सुनीता अंतंब्राह्य अमेरिकन आहे

एकदम कबूल.

हे असे आपण का करतो? मला वाटते, आपली अगदी हताश, हतबल मानसिकता ह्याला कारणीभूत आहे. स्वतःला काही एका पातळीच्या पलिकडे खरोखरीच देदिप्यमान असे करण्याची आपणाल कुवत नाही, हे आपण ओळखलेले आहे. (आऊटसोर्सींग आपल्या देशात होते, आपली सॉफट्वेअरमधली प्रगती हे सर्व एका ठराविक टप्प्यापर्यंत आहे). त्यामुळे मग कुणीतरी भारतीय वंशाचा पण परदेशातच वाढलेला, अथवा सर्व कार्य तिथेच करून जगमान्य पावलेला मिळाला (हरगोविंद खुऱाणा, अमर्त्य सेन, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स् इत्यादी) की मार उड्या त्यांच्या नावाने, हे एक. नाहीतर अगदी खालच्या पातळीवर दूसरे अजून एक आपण नेटाने करत रहातो, ते म्हणजे काहीही करून 'गिनेस् बुकात' आपले नाव आणण्याची धडपड. मग त्यासाठी 'डाव्या पायाच्या तिसऱ्या बोटाचे नख १३ १/२/ " वाढवले', ' उजव्या नाकपुडीतला एक केस ६.३४५" वाढवला' असले 'विक्रम' आपल्याकडे होत असतात!