छान! विदर्भात खरे तर एकच भाषा नाही. पश्चिम विदर्भातील वऱ्हाडी, पूर्व भागातील झाडी आणि नागपूरची ह्या दोन भाषांसोबत हिंदीची सरमिसळ होऊन झालेली तिसरीच भाषा आहे.
मात्र बोलीभाषांमध्ये असे काही समर्पक शब्द सापडतात की ते नेमकेपणाने व्यक्त करायला प्रमाण मराठीमध्ये आख्खे वाक्य लिहायला लागावे. उदा. "हदाल" हा वऱ्हाडी शब्द. वयात आलेली किंवा येऊ घातलेली मुलगी शृंगार करते पण घरकाम करायचा तिला कंटाळा येतो. अशा खास आळशीपणासाठी "हदाल" हा काहीसा शिवीवाचक शब्द आहे. पण बव्हंशी फक्त घरातील मोठ्या स्त्रियाच हा शब्द वापरतील, पुरुष मंडळी नाही.
वऱ्हाडी कवी प्रा. देवीदास सोटे सांगायचे त्याप्रमाणे वऱ्हाडी भाषा ही प्रमाण मराठीपेक्षा संस्कृतशी जास्त जवळिक साधून आहे. इथल्या स्त्रिया "मी येतो/जातो" म्हणतात, संस्कृतसारखेच क्रियापदात लिंगभेद नाही.