मला मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा रास्त अभिमान आहे, पण भाजप, शिवसेना वगैरे फालतू राजकारणाशी माझे काहीही देणेघेणे नाही.
'कुणीही यावे, टपली मारून जावे' असेच आहोत, व इथून पुढेही आपण तसेच राहणार. 
इंदिराबाई थोड्या वेगळ्या होत्या

प्रदीप, या तीनही विधानांबद्दल आश्चर्य वाटते. आजचे राजकारण कितीही उबगवाणे असले तरी त्याबाबत इतका indifference  योग्य नाही. 'यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ दी सिस्टीम टू इंप्रूव्ह इट' वगैरे. भाषा व संस्कृतीचे राजकारण ही काही नवी गोष्ट नाही आणि सगळ्याच पक्षांनी ते केले आहे. पण त्याबाबत इतकी अनास्था आणि इतका निराशावादी दृष्टीकोन बरा नव्हे.
इंदिराबाईंचे वेगळेपणही कळाले नाही. सत्तेचा बेलगाम वापर आणि मनमानी हे तर सगळेच राजकारणी करतात!