इंदिराबाईंचे वेगळेपणही कळाले नाही. सत्तेचा बेलगाम वापर आणि मनमानी हे तर सगळेच राजकारणी करतात!
इंदिराबाईंची भलावण मी भारताच्या जागतिक प्रतिमेच्या संदर्भात केली आहे. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी बाई एकदम खंबीरपणे वागल्या. त्यावेळी एक महासत्ता आपल्या मागे उभी होती हे खरे आहे, पण ती तशी आहे, म्हटल्यावर त्या परिस्थितीचा फायदा उठवायला जी एक राजकीय तयारी (पोलिटिकल विलिंगनेस्) लागते, ती त्यांच्यापाशी होती. अलीकडेच अमेरिकाच्या गुप्तहेर विभागाने तत्कालीन टिप्पण्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यानुसार त्यांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व सुरक्षा सल्लागार आपापसात बोलताना दातओठ खाऊन बाईंना शब्दशः: शिव्या घालत होते. हे बरेच काही सांगून जाते.