अमेरीकेने शिव्या घातल्या म्हणजे एखादी व्यक्ती कर्तबगार कशी काय होऊ शकते बुवा? 

उलटपक्षी बांगलादेश प्रकरणात आपण नको इतके सौम्य वागलो. ९३००० (चू.भू.द्या̱̱. घ्या.)  कैद्याच्या बदल्यात काश्मिर कायमचा आपला करता आला असता. बांग्लादेशातील राजकारणावर आपला आज काय प्रभाव आहे? ईशान्यपूर्व भारतात जाण्यासाठी आपल्याला बांग्लादेशाला वळसा घालून जावे लागते. एका रस्त्याची सोय देखील आपल्याला करून घेता आली नाही. वाचा आजचा सकाळ ( तज्ञानी येथे लिंक द्यावी.) बांगलादेश हे मुस्लीम मूलतत्व वाद्यांचे नवे आश्रयस्थान आहे.

बाईंनी कर्तबगारी दाखवली पण काम पूर्ण केले नाही!! बांग्लादेशातील हिंदूंची संख्या सातत्याने कमी होत आहे..नवे तलीबान आकार घेत आहे!

याउलट, कोणतीही महासत्ता पाठीशी नसताना अमेरीकेच्या नाकावर टीच्चून अणुस्फोट घड्वणारे वाजपेयी अधिक कर्तबगार होते असे मी म्हणेन!

अरे हो...नेहमीप्रमाणे चर्चा भरकटलीच. प्रतिभा पाटील या मराठी आहेत त्यापेक्षा त्या योग्य उमेदवार आहेत का? यावर चर्चा व्हायला हवी नाही का?

की प्रत्येक मराठी माणूस "ग्रेटच" असतो? हे म्हणजे आगरकर खेळो अथवा न खेळो तो मराठी आहे ना मग संघात असलाच पाहीजे , भले म्याच हरली तरी चालेल असे म्हणण्यासारखे आहे!!!!

बाकी शिवसेनेच्या राजकीय परिपक्वतेबद्दल न बोलले तर अधिक बरे. धरसोड वृत्तीमुळे न घर का न घाट का अशी अवस्था आहे. कधी कधी मला गम्मत वाटते.. टोप्या फिरवण्याची कॉग्रेसी सर्कस शिवसेना करु पाहते तेव्हा! शिवसेना ही संघटना काही एक विशाल ध्येय अथवा अस्मिता घेऊन जन्माला आली, याउलट 'कसलिही अस्मिता नसणे' हेच कॉग्रेसींचे क्वालीफिकेशन ! कॉग्रेसची नक्क्ल शिवसेने;ला कशी जमेल?

असो.. मंडळी, आपण हा राजकारणाचा उकिरडा का उकरतोय?  काय तरी चांगले विषय काढा की राव!

-विटेकर