चर्चा अशा थोड्याशा भरकटणार, इलाज नाही.

आपण बांगलादेशबद्दल जे जे लिहिलेत, त्याविषयी दुमत नाही. पण हे सर्व फारच अलिकडे झाले, त्याला इंदिराबाई कशा जबाबदार? 

बाईंनी कर्तबगारी दाखवली पण काम पूर्ण केले नाही!!

कबूल. आपण बरेचदा लढाई जिंकतो, पण युद्ध हरतो. शास्त्रींनीही हेच केले १९६५ मध्ये.

अमेरीकेने शिव्या घातल्या म्हणजे एखादी व्यक्ती कर्तबगार कशी काय होऊ शकते बुवा?

बाईंनी त्यांना भीक घातली नाही, ते फ्रस्त्रेट झाले. कुठच्या अगोदरच्या अथवा नंतरच्या नेत्याचे असे करण्याची हिंमत झाली?

याउलट, कोणतीही महासत्ता पाठीशी नसताना अमेरीकेच्या नाकावर टीच्चून अणुस्फोट घड्वणारे वाजपेयी अधिक कर्तबगार होते असे मी म्हणेन!

सर्वात पहिला अणुस्फोट बाईंनी घडवून आणला होता.

आणि बाजपेयींबद्दल हे विसरता येत नाही की कंदहारला जाऊन अतिरेक्यांच्या समोर साक्षात लोटांगण त्यांच्याच परराष्ट्रमंत्र्यांनी घातले! भारताच्या इतिहासातला हा एक काळा दिवस मानला जावा!