प्रदीप,

आपल्या प्रतिसादाबद्दल आणि मुख्य म्हणजे मतप्रदर्शनाबद्दल शतशः धन्यवाद!

१. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट:

ही संस्था माझी तर नाहीच; शिवाय या संस्थेशी मी बाहेरुन निगडीत आहे. 'डॉ. कलबाग' या शास्त्रज्ञाने ही संस्था ८० च्या दशकात सुरु केली. माझ्या पुढच्या लिखाणात हे सांगेनच मी.

२.

... तरी सर्वसामान्य कर्मचारी उच्चशिक्षित असतातच असे नव्हे. आपण काम कसे करता आहात, ह्याला महत्त्व दिले जाते, शिक्षणाला नव्हे....

आपल्या या मताला खरोखरीच महत्त्व आहे. 'शिक्षण नाही तर संधी नाही..' असं लिहितांना मी आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा  संदर्भ घेतला होता. त्यामुळे आपण जे म्हणता (मुख्य सांगायचे तर,  शिक्षण नाही तर संधी नाही..) त्यात गैर काहीच नाही, पण आत्ताच्या आपल्या मनसिकतेमुळे तसे घडते आहे (असे मला म्हणायचे होते!).

आपण दर्शवलेल्या माझ्या चुकीबद्दल आणि 'अव्यवस्थित नाही हे नमुद करण्याबद्दल' धन्यवाद!

आमितराज