आंब्याचे उदाहरण योग्य असले तरीही हा एकंदरीतच गुणवत्तेचा प्रश्न आहे असे मला वाटते.  शेतीमालाशी संबंधित उत्पादने खराब होण्याची काही तांत्रिक कारणे आहेत.  भारत हा उष्ण कटिबंधातील देश असल्याने नाशवंत मालाचे प्रमाण अधिक आहे.  भारतातील एक मोठा शेतकरी वर्ग हा परंपराप्रिय व  शेतीमाल प्रक्रिया आणि साठवण याबाबतच्या तंत्रज्ञानाशी परिचित नसलेला असा आहे. (हे चित्र बदलते आहे, हेही तितकेच खरे आहे). शेतीमाल प्रक्रिया या विषयावर होत असलेला अभ्यास आणि संशोधन लाल फितीत अडकून पडले आहे.   पण माझ्या मते हा प्रश्न सर्वात जास्त संबंधित आहे तो मानसिकतेशी. उत्पादन आणि सेवा प्रदान करणाऱ्यांनी गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये अशी मानसिकता भारतीयांमध्ये तयार होणे गरजेचे आहे. मगच भारतीय उत्पादने व सेवा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारल्या जाऊ लागतील.