"मनकवडा" महाशय,
या चर्चेतील इतर तयार झालेल्या मुद्द्यांवर वेगळी चर्चा होऊ शकेल म्हणून विषयांतर टाळून फक्त आपल्या प्रश्नांपुरताच प्रतिसाद मर्यादीत ठेवतो:
मराठी भाषा व संस्कृती चा अभिमान असणाऱ्या मंडळींना आता काय वाटते?
प्रतिभाताईंनी "मराठी" आणि मराठी संस्कृतीसाठी इतक्या वर्षांमधे एक राजकीय निवडून आलेली व्यक्ती/पुढारी म्हणून काय केले हे कळले तर बरे होईल. उद्या बेळगावचा प्रश्न घेऊन महारष्ट्र त्यांना भेटायला गेला तर त्या काय म्हणतील? "मुंबई" ला "सिईओ" देऊन उर्वरीत राज्यापासून तोडले तर त्या काय म्हणतील? निवडणूकीत उभे राहताना स्वतःची मालमत्ता किती ते त्या सांगणार आहेत का? का तेंव्हा त्या राष्ट्राचा विचार करणार? त्यांच्यावर विरोधक (अर्थात त्यात भाजप जास्त) आरोप करत आहे त्याबद्दल त्या "मी ते आरोप मान्य करत नाही" अशा आअशयाच्या विधानापेक्षा जास्त का बोलत नाहीत?
उगाच उठसुठ कोणीही मराठी म्हणून त्याचा अभिमान करावा का? तशी अभिमान वाटावी अशी माणसे वेगळी आहेत अगदी राजकारणात पण. म्हणूनच जेंव्हा शरद पवार "बिसीसीआय" चे अध्यक्ष झाले तेंव्हा तो अभिमान नकळत वाटला. उद्या ते पंतप्रधान झाले तर नक्कीच वाटेल. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचे मराठीचा अभिमान वाटावा म्हणून आपण स्वत: काही करतो का हा प्रश्न आपण प्रत्येकान स्वतःलाच विचारून उत्तर शोधले पाहीजे. तेच "भारतीय" म्हणूनही.
भाजपा आणि संघाचा नतद्रष्टपणा चव्हाट्यावर येत आहे तेव्हा सगळी भाजपा प्रेमी मंडळी गप्प का बसली? की संघाचे प्रेम मोठे की राज्याचे हा संभ्रम पडला आहे?
ही निवडणूक आहे. निवडणूक म्हण्ल्यावर त्यात राजकारण आहे. शिवाय ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे राज्याचे प्रेम येथे आणणे उचीत नाही. त्या शिवाय, जर काँग्रेसला राज्याचे एव्हढे प्रेम आहे तर कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना ज्यांनी महाराष्ट्र विरोधी भुमीका घेतली होती त्यांना राज्यपाल कसे केले? वास्तवीक ज्या राज्यांमधे राजकीय मतभेद आहेत त्या राज्यांमधले राजकीय पुढारी एकमेकामधे राज्यपाल करू नयेत असा अलिखीत नियम आहे. पण तेंव्हा महाराष्ट्राचा कोणी विचार केला नाही आणि एकाही राज्याच्या कॉग्रेसच्या पुढाऱ्याने त्याला विरोध केल्याचे ऐकले नाही.
प्रतिभा पाटील राष्ट्रपती होवो किंवा न होवो, एका कर्तबगार स्त्रीला राष्ट्रपती होताना विरोध करणे किंबहुना "पंतप्रधानांच्या बचावासाठी दुबळा राष्ट्रपती" अशी टीका करून स्वतः:ची वृत्ती किती कूपमंडूक आहे याचे त्यांनी जगजाहीर प्रदर्शन केले आहे. शिवसेना ला तरी कधी नव्हे ते अक्कल आली. देव पावला.
नक्की कर्तबगार म्हणजे काय? लोकसत्ता सारख्या काँग्रेसची भलावण आणि संघ.भाजपवर कुठेही टिका करणाऱ्या पत्रालादेखील असे म्हणावे लागले की "गांधी घराण्याशी" इमान राखल्याबद्दल मिळालेली बक्षीसी आहे..."पंतप्रधानांच्या बचावासाठी दुबळा राष्ट्रपती" असे म्हणायचे कारण असे की कलामांनी सोनीयाला पंतप्रधान होण्यासाठी गेली असताना योग्य कायदा दाखवून गप्प केल्याचे म्हणले जाते. विषयांतर होईल म्हणून इतकेच तुर्त लिहीतो. सोनीयाला पंतप्रधान अर्थातच होयचे होते कारण "नॉमिनेशन" झाले तेंव्हा त्यात त्यांनी "सेल्फ़ नॉमिनेशन" केले हे सरकारी दफ्तरी आहे.. तेंव्हा "मला होयचे नव्हते वगैरे" त्यांनी म्हणणे आणि तसे मानणे- दोन्ही खुळचटपणा. हा झाला आता इतिहास पण उद्या प्रतिभा अशी वेळ आल्यास काय करणार जा प्रश्न आहे.
शिवाय स्त्री म्हणूनच करायचे तर काँग्रेसने काय किंवा आम जनतेने काय कर्तुत्व रणांगणावरे दाखवलेल्या "कॅ. लक्ष्मी" ना कलामांविरूद्ध पाठींबा का दिला नाही? निवडणूक ही निवडणूक त्यात एकदा कोणी उमेदवार असला की त्याला/तीला आजच्या काळात (थँक्स तू इंटरनेट, मेडीया आणि सुजाण होत असलेली जनता..) अग्नीपरीक्षेतून जावे लागणारच. मग तेंव्हा उगाच "रडीचा डाव" करायचा नाही की मी बाई आहे किंवा मी कसा मागासलेला होतो. अल्पसंख्यांक होतो अथवा गरीब होतो वगैरे वगैरे...
जगातील भारताची प्रतिमा भाजपाने जेवढी मलिन केली तेवढी पुरे नव्हते की काय कोण जाणे.
आपल्याला भाजप आवडत नसल्यास तो आपला प्रश्न आणि वास्तवीक कुणालाच कोणता राजकीय पक्ष "आवडत" असेल तर कीव करावीशी वाटेल. पण एक लक्षात घ्या की जे काँग्रेस ने केले नाही ते भाजपने केले - पोखरण #२. परीणाम पाकीस्तानचा उद्देश बाहेर आला. आणि आपली शक्ती जगाला दिसली. त्यानंतर आपले संपूर्ण जगातलेच व्यापारी संबंध कमी होण्या ऐवजी वाढलेत एव्ह्ढे लक्षात ठेवा. परीणामी अमेरीकेत आता कोणी रस्त्यावरील गायी आणि हत्ती फिरणारा देश म्हणत निर्भत्सना करत नाहीत तर आता अमेरिकन काँग्रेसमधे सुरवातीच्या "इन्वोकेशनच्या" वेळेस प्रथमच (आपणहून) वेदोच्चार होणार आहे.
जाता जाता.... मी काँग्रेस प्रेमी नव्हे. जगात भारताची प्रतिमा काय आहे याला मात्र मी महत्त्व देतो करणं त्याचा परिणाम भारताच्या अर्थशास्त्रावर परिणामी सामान्य माणसाच्या राहणीमानावर होतो.
जगात आपली प्रतिमा काय हे आपण कसे दाखवतो यावर ठरते आणि आपल्या शक्तीवर - अणुशक्ती, संगणकीय शक्ती आणि सर्वात मोठी ज्यावर तमाम (प्रगत) जगाचा विश्वास आहे ती म्हणजे लोकशाहीची शक्ती.. आज आपण फुकाचे स्वाभिमानी राहीलो नसून अत्मविश्वास असलेला एक समाज झालो आहोत. जो पर्यंत हा आत्मविश्वास डोळस राहील तो पर्यंत आपले कोणी काही वाकडे करू शकणार नाही. अजून फक्त एकाच गोष्टीची भारतीय म्हणून भारतात तात्काळ गरज वाटते ती म्हणजे - अर्थकारणातील सामाजीक विषमता - जी सरकार पेक्षा खाजगी क्षेत्र आणि उच्च समाजाच्या हावेमुळे होत आहे आणि त्याचे परीणाम गंभीर आहेत. तीगेल्यास त्या मुळे होणाऱ्या अनेक गोष्टींनी आपले स्थान हे एक महासत्ता म्हणून २०२० साली होऊ शकेल असे वाटते. पण त्याला काँग्रेस अथवा भाजप नि साधू-संत असण्यापेक्षा तुमच्या आमच्या सारख्या व्यक्तींनी आणि खाजगी उद्योगांनी डोळस होणे महत्त्वाचे आहे असे वाटते..